Raj Thackeray Yavatmal Speech : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यवतमाळ जिल्ह्यातील वणी इथं सभा झाली. यावेळी यवतमाळ जिल्ह्यातील दुरावस्थेकडं त्यांनी लक्ष वेधलं. यवतमाळ जिल्ह्याची ओळख पांढरं सोनं पिकवणारा जिल्हा अशी होती. ती आज सर्वाधिक आत्महत्यांचा जिल्हा अशी झाली आहे. याची आपल्याला लाज वाटत नाही, अशी खंत राज ठाकरे यांनी व्यक्त केली. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट राजकारणी ठरवत आहेत. तुमच्या आयुष्यातील पाच-पाच वर्षे वाया जात आहेत. माझा पुनर्जन्मावर विश्वास नाही. जे काही आहे तो हाच जन्म. त्यामुळं आतातरी विचार करून मतदान करा, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं.