Suresh Dhas Video : बीड जिल्ह्यातील आष्टी उपसा सिंचन योजना क्र. ३ अंतर्गत येणाऱ्या शिंपोरा ते खुंटेफळ पाईपलाईन कामाची पाहणी तसेच बोगदा कामाचा शुभारंभ सोहळा नुकताच पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत यावेळी उपस्थित नेत्यांची भाषणं झाली. संतोष देशमुख हत्या प्रकरण लावून धरणारे आमदार सुरेश धस यांनी यावेळी जोरदार टोलेबाजी केली. त्यांनी अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडे यांनाही टोले हाणले.