Narendra Modi Solapur Speech Video : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सोलापुरात विविध विकास प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आलं. मोदींनी यावेळी सोलापुरातील रायनगर हाऊसिंग सोसायटीत बांधण्यात आलेल्या १५ हजार घरांचंही लोकार्पण केलं. विडी कामगारांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ही घरे बांधण्यात आली आहेत. ही घरे शहरातील हातमाग कामगार, विक्रेते, यंत्रमाग कामगार, कचरा वेचक, विडी कामगार, चालक अशा लाभार्थ्यांना देण्यात येणार आहेत. याविषयी बोलताना मोदींचा स्वर हळवा झाला. त्यांना आपलं बालपण आठवलं. मलाही अशा घरात राहायला मिळालं असतं तर किती बरं झालं असतं, असं ते यावेळी म्हणाले.