आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल (ICC World Test Championship) ची फायनल भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु झाली आहे. लंडनच्या ओव्हल मैदानावर हा सामना सुरू आहे. तब्बल दहा वर्षांनंतर आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची संधी भारताला आहे. त्यासाठी भारतीय खेळाडूंनी कसून सरावही केला आहे. सामना होण्याआधी भारतीय क्रिकेटपटू जेव्हा लंडनमध्ये पोहोचले, तेव्हा तिथल्या भारतीय चाहत्यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं.