India vs Pakistan WC 2023 : विश्वचषक स्पर्धेच्या आज झालेल्या हायव्होल्टेज सामन्यात भारतीय क्रिकेट संघानं पाकिस्तानचा अवघ्या ३० षटकांत धुव्वा उडवत दणदणीत विजय मिळवला. तब्बल ७ गडी राखून मिळवलेल्या या विजयामुळं क्रिकेटप्रेमींच्या आनंदाला पारावार उरला नाही. पाकिस्तान विरुद्धच्या या विजयानंतर अवघा देश आनंदाच्या लाटेवर स्वार झाला. ठिकठिकाणी फटाके फोडून आणि मिठाई वाटून जल्लोष करण्यात आला. गुजरात, महाराष्ट्र, बिहारपासून ते जम्मू काश्मीरपर्यंत तरुणांनी भारतीय ध्वज हातात घेऊन जल्लोष केला.