Eknath Shinde Praises Nana Patole : नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी आणि अध्यक्षपदाच्या निवडीसाठी सध्या राज्य विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड झाल्यानंतर आज त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्या प्रस्तावावर भाषण करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार टोलेबाजी केली. 'नाना पटोले यांच्यामुळंच राहुल नार्वेकर यांना अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसण्याची संधी मिळाली आणि पुढं आमचीही गाडी सुरू झाली. त्यामुळं नाना पटोले हे आमचे खरे मित्र आहे. मीडियासमोर ते आमच्याबद्दल काहीही बोलत असले तरी ते आमचे मित्र आहेत, असं सूचक वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलं.