Devendra Fadnavis On Budget : अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प मांडला. चार महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पात विविध घोषणा करण्यात आल्या. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या अन्य नेत्यांनी या अर्थसंकल्पावर टीका केली. या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार उत्तर दिलं. अर्थसंकल्पावर टीका करणाऱ्या विरोधकांच्या बोलण्यात जोर नव्हता आणि चेहऱ्यावर नूर नव्हता, असा टोला त्यांनी हाणला. अर्थसंकल्पात सांगितलेली प्रत्येक गोष्ट आम्ही ठराविक वेळेत पूर्ण करू. हा निवडणुकीचा नसून निर्धाराचा अर्थसंकल्प आहे हे आम्ही दाखवून देऊ, असंही फडणवीस म्हणाले.