eknath shinde praises Rahul Narwekar : नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी आणि अध्यक्षपदाच्या निवडीसाठी सध्या राज्य विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड झाल्यानंतर आज त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्या प्रस्तावावर भाषण करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार टोलेबाजी केली. 'मागील काळात अध्यक्षपदी असताना राहुल नार्वेकर यांनी समतोल बुद्धीनं आणि सचोटीनं निर्णय घेतले. पक्षांच्या संदर्भातील निर्णय घेताना दबाव येऊनही त्यांनी रामशास्त्री बाणा दाखवला, अशा शब्दांत शिंदे यांनी राहुल नार्वेकर यांचं कौतुक केलं.