Rahul Gandhi On Maharashtra Election : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठी गडबड झाल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषदेत घेऊन केला. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मतदार अचानक वाढले आहेत. महाराष्ट्रात प्रौढांची संख्या जितकी आहे, त्यापेक्षा जास्त संख्या मतदारांची आहे, असं कसं होऊ शकतं? असा सवाल त्यांनी केला. भाजपचे अनेक उमेदवार ९० टक्क्यांच्या स्ट्राइक रेटनं जिंकले आहेत. इतिहासात इतक्या मोठ्या मतांनी कुणीही जिंकलेलं नाही, असा दावाही त्यांनी केला. निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातील मतदारांची नावांची यादी काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना व शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला द्यावी, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.