Bhaskar Jadhav Speech Video : शिवसेनेतील उभ्या फुटीनंतर उद्धव ठाकरे यांची पहिली जाहीर सभा ५ फेब्रुवारी २०२३ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड इथं झाली. या सभेत आमदार भास्कर जाधव यांनी माजी मंत्री रामदास कदम यांच्यावर सडकून टीका केली. भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांना 'बामलाव्या' अशी उपाधी दिली. त्यांना हिशेबही कळत नाही, अशी जोरदार टीका जाधव यांनी केली.