Navale Bridge Accident: पुणे-बेंगळुरू महामार्गावरील नवले पुलावर रविवारी रात्री भीषण अपघात झाला. एका भरधाव कंटेनरनं एका मागोमाग एक २४ वाहनांना धडक दिली. त्यात १२ लोक जखमी झाले आहेत. अपघातानंतरचं दृश्य हादरवून टाकणारं होतं. एकच गोंधळ उडाला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेची दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत. तर, ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.