Mahakumbh 2025 : प्रयागराज इथं सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात भाविकांनी शाही स्नानासाठी मोठी गर्दी केली आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर देखील रोजच्या रोज त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान घेत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी साधू व महंतांसह नुकतंच पवित्र स्नान केलं.