Khadakwasla dam overflow video : पुण्याला पावसाने चांगलेच झोडपले आहे. बुधवारी सकाळपासून शहरात पावसाची संततधार सुरू आहे. जिल्ह्यात बहुतांश भागात पावसाचा जोर वाढला आहे. खडकवासला धरणातून सकाळपासून ५० हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळं धरण परिसराला पुराचा फटका बसला आहे. पुणे शहरात पावसामुळं दैनंदिन जनजजीवन पुरते विस्कळीत झाले आहे. रस्ते व गल्ल्यांमध्ये पाणी तुंबले आहे. बैठ्या घरांमध्येही पाणी शिरले आहे. प्रशासनानं अडकलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.