Pune Rain Video : पुण्याला पावसाने चांगलेच झोडपले आहे. बुधवारी सकाळपासून शहरात पावसाची संततधार सुरू आहे. जिल्ह्यात बहुतांश भागात पावसाचा जोर वाढला आहे. पुणे शहरात पावसामुळं दैनंदिन जनजजीवन पुरते विस्कळीत झाले आहे. रस्ते व गल्ल्यांमध्ये पाणी तुंबले आहे. बैठ्या घरांमध्येही पाणी शिरले आहे. प्रशासनानं अडकलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.