Pune Collector on Rain : पुण्यातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, जुन्नर, आंबेगाव तालुक्यात जोरदार पाऊस झाला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले आहे. या भागातील तसेच, पुणे व पिंपरी-चिंचवडमधील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. महापालिका व आपत्ती व्यवस्थापनाचे कर्मचारी मदत व बचावकार्यात गुंतले आहेत. पावसामुळं वाहतुकीला अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी नागरिकांना खबरदारीचं आवाहन केलं आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडा, असं त्यांनी सांगितलं आहे.