Mumbai Rain Video : पुण्याबरोबच मुंबई शहरालाही पावसानं जोरदार तडाखा दिला आहे. या पावसामुळं मुंबईतील अनेक भागांत पाणी साचलं आहे. विलेपार्ले, कालिना, चेंबूर, साकीनाका, घाटकोपर, अंधेरी यांसह अनेक भागांत ठिकठिकाणी पाणी तुंबलं आहे. रेल्वे व रस्ते वाहतुकीलाही पावसाचा फटका बसला आहे. मध्य रेल्वे मार्गावर गाड्या उशिरानं धावत असून काही रस्त्यांवरही वाहतूक कासवाच्या गतीनं सुरू आहे.