Mumbai Rain video : रविवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या मुसळधार पावसामुळं मुंबईला जोरदार तडाखा दिला आहे. पावसामुळं मुंबईतील बहुतांश भागात पाणी तुंबलं आहे. रस्ते पाण्यात गेले आहेत. गाड्या अर्ध्या पाण्याखाली गेल्या आहेत. लोकल सेवा कोलमडली आहे. वाहतूक सेवेचा बोजवारा उडाल्यामुळं शाळा व कॉलेजांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. कुर्ला, सायन, चुनाभट्टी, साकीनाका यासह सर्वच सखल भागांत गुडघाभर पाणी तुंबलं आहे. बैठ्या चाळीतील घरांमध्ये पाणी शिरलं आहे. पाण्याचा निचरा लवकरात लवकर व्हावा म्हणून महापालिकेची यंत्रणा कामाला लागली आहे.