Harshvardhan Patil taunt Ajit Pawar : भारतीय जनता पक्ष सोडण्याचा निर्णय घेणारे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज अखेर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केलं. त्यांनी नाव न घेता अजित पवार यांना टोला हाणला. पवार कुटुंबीयांसोबत आमचे संबंध नेहमीच चांगले होते. कधीच कटुता नव्हती. राजकारणात थोडं इकडं-तिकडं झालं होतं. मात्र एकमेकांबद्दल कधीच आम्ही चुकीचं बोललो नाही. आमचं दुखणं वेगळंच होतं, तेही आता बाजूला गेलं. त्यामुळं आता कसलाही त्रास कोणालाच होणार नाही, असं पाटील म्हणाले.