Eknath Shinde Video : आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपुरात आज विठ्ठलभक्तांचा महापूर आला आहे. देशभरातून वारकरी पंढरीत दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील शासकीय महापूजेसाठी आज पंढरपुरात होते. त्यांच्या हस्ते सलग तिसऱ्यांदा विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा झाली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरच्या सर्वांगीण विकासाचा शब्द दिला. पंढरपुरात भक्तांना दर्शनासाठी १८-१८ तासांची राग लावावी लागते. हे दर्शन जास्तीत व्यवस्थित व्हावे व वारकऱ्यांना कमीत कमी त्रास व्हावा, यासाठी पंढरपुरात तिरुपती बालाजी मंदिराच्या धर्तीवर दर्शन सुविधा निर्माण केली जाणार आहे. दर्शन मंडपाची उभारणी करून टोकन पद्धत सुरू करण्यात येईल. त्यासाठी लागणारे १०३ कोटी रुपये लवकरात लवकर दिले जातील, अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली.