महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्लीमध्ये ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमानिमित्त शरद पवार व एकनाथ शिंदे एकाचा मंचावर आले होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी खुसखुशीत भाषण करत शरद पवारांवर स्तुतीसुमनं उधळली. शरद पवार यांची राजकारणातील गुगली कोणालाही कळत नाही. बाजूला बसलेल्यांनाही कळत नाही. पण त्यांनी मला अजून कधी गुगली टाकलेली नाही. यापुढंही टाकणार नाहीत, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी बोलून दाखवला. त्यावर एकच हशा पिकला.