IAF Flypast Rehearsal Video : प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात राजधानी दिल्लीत भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांच्या शक्तीचं दर्शन जगाला घडवलं जातं. यावेळी तिन्ही दलाचे जवान प्रात्यक्षिके सादर करतात. यात हवाई दलाचाही समावेश असतो. या फ्लायपास्टची रंगीत तालीम सध्या कर्तव्यपथावर सुरू आहे.