Asalpha Flood Video : मुंबईत घाटकोपरमधील असल्फा व्हिलेजमध्ये शुक्रवारी मध्यरात्री ७२ इंचाची पाईपलाईन अचानक फुटल्यानं अक्षरश: पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं रहिवाशांची अक्षरश: तारांबळ उडाली. असल्फा परिसरातील रस्तेही पाण्याखाली गेले होते. ही पाइपलाइन फुटल्यानं आसपासच्या परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. महापालिकेनं पाईपलाईन दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर हाती घेतलं आहे.