Lalbaugcha Raja First look video : गणेशोत्सवाला दोन दिवस उरले असताना मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाची पहिली झलक गुरुवारी दाखवण्यात आली. मंडळाच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवरून भाविकांना हे दर्शन घेता आलं. राजाची झलक दिसताच ही शान कुणाची, लालबागच्या राजाची... अशा घोषणांचा गजर करण्यात आला. लाडक्या राजाचं दर्शन याचि देही, याचि डोळा घेता यावं यासाठी मंडळाच्या मंडपातही गणेशभक्तांनी गर्दी केली होती.