Maharashtra Assembly Elections Video : निवडणूक प्रचार दौऱ्यावर असलेले शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बॅगेची वणी इथं निवडणूक कर्मचाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली. त्यामुळं उद्धव ठाकरे भडकले. आतापर्यंत किती राजकीय नेत्यांच्या बॅगा तुम्ही तपासल्या? एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, नरेंद्र मोदी किंवा अमित शहांच्या बॅगा तपासल्या का, असा सवाल ठाकरे यांनी केला. बॅगा तपासायला माझी हरकत नाही. पण हाच न्याय इतरांनाही लावा. मोदींची बॅग तपासल्याचा व्हिडिओ मला पाठवा, असं उद्धव ठाकरे यांनी ठणकावलं.