Eknath Shinde Speech Video : नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी आणि अध्यक्षपदाच्या निवडीसाठी सध्या राज्य विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड झाल्यानंतर आज त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्या प्रस्तावावर भाषण करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार टोलेबाजी केली. राहुल नार्वेकर यांचं कौतुक करताना एकनाथ शिंदे यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केलं. निवडणूक निकालावरून आता पुन्हा फेक नरेटिव्ह पसरवला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. नाना पटोले, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांची नावं घेत शिंदे यांनी विरोधकांना जोरदार टोले हाणले.