Video : एकनाथ शिंदेंना जावंच लागणार, बचावाचा मार्ग नाही, असं का म्हणाले पृथ्वीराज चव्हाण?
मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : एकनाथ शिंदेंना जावंच लागणार, बचावाचा मार्ग नाही, असं का म्हणाले पृथ्वीराज चव्हाण?

Video : एकनाथ शिंदेंना जावंच लागणार, बचावाचा मार्ग नाही, असं का म्हणाले पृथ्वीराज चव्हाण?

Updated Jul 06, 2023 06:32 PM IST

Prithviraj Chavan on Eknath Shinde : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट व त्याचे संभाव्य परिणाम यावर बोलताना राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी खळबळजनक दावा केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांचे १६ आमदार यांच्या निलंबनाचा निर्णय लवकरच लागू शकतो. त्यांचं निलंबन जवळपास निश्चित आहे. तसं झाल्यास त्यांचं मुख्यमंत्रीपद जाणार आहे. त्यानंतर पुढचे मुख्यमंत्री अजित पवार असतील, असं चव्हाण यांनी म्हटलं आहे. अजित पवार यांना सरकारमध्ये सहभागी करून घेण्याची रणनीती दिल्लीतच ठरली असून जास्तीत जास्त आमदार व खासदार निवडून आणण्याच्या अटीवर त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं जाईल, असं चव्हाण यांनी सांगितलं.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp