Eknath Shinde Taunt Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्तानं २३ जानेवारी २०२५ रोजी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा मेळावा मुंबईतील बीकेसी संकुलात पार पडला. या मेळाव्याला मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर निशाणा साधला. काही लोक स्वबळावर निवडणुका लढण्याची भाषा करत आहेत. पण स्वबळावर लढायला मनगटात ताकद लागते. सहनही होत नाही आणि सांगताही अशी ह्यांची अवस्था झालीय, असा टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना हाणला.