मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : आम्ही टांगा पलटी केला नसता तर महाराष्ट्र १५ वर्षे मागे गेला असता; शिंदेंची फटकेबाजी

Video : आम्ही टांगा पलटी केला नसता तर महाराष्ट्र १५ वर्षे मागे गेला असता; शिंदेंची फटकेबाजी

Jul 28, 2023 04:52 PM IST Ganesh Pandurang Kadam
Jul 28, 2023 04:52 PM IST

Eknath Shinde Speech in Vidhan Sabha : महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळं अनेक ठिकाणी दुर्घटना घडल्या असून शंभरहून अधिक लोकांना जीव गमवावा लागला आहे. तसंच, आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचंही मोठं नुकसान झालं आहे. विरोधकांनी शेतकऱ्यांची ही व्यथा-वेदना सभागृहात मांडली होती. त्या चर्चेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज उत्तर दिलं. राज्य सरकार शेतकऱ्यांना पूर्णपणे मदत करत आहेत. पावसामुळं नुकसान झालेल्यांनाही तात्काळ मदत देणं सुरू आहे. इर्शाळवाडीतही बाधित लोकांसाठी कंटेनर ठेवले आहेत. त्यांना गैरसोयीच्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं नाही, असं शिंदे यांनी सांगितलं. महाविकास आघाडी सरकारचा टांगा पलटी केला नसतर तर महाराष्ट्र १५ वर्षे मागे गेला असता, असंही ते यावेळी म्हणाले.

More