Eknath Shinde Resignation : शिवसेनेत बंड करून भाजपसोबत आलेले व मुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागलेले एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रिपद महायुतीच्या प्रचंड विजयानंतर मात्र गेलं आहे. राज्यात पुन्हा एकदा भाजपचा मुख्यमंत्री विराजमान होण्याची दाट शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी राजभवनावर जाऊन आज सकाळी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे देखील यावेळी उपस्थित होते.