Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी उमेदवारी अर्ज दाखल होऊ लागले आहेत. राज्य सरकारमधील विद्यमान मंत्री धनंजय मुंडे यांनी आज परळी विधानसभेतून आपला उमेदवारी अर्ज भरला. तत्पूर्वी, आमदार पंकजा मुंडे, माजी खासदार प्रीतम मुंडे यांनी औक्षण करून त्यांना शुभेच्छा दिल्या.