श्रावण महिना म्हणजे व्रतवैकल्यांचा महिना. या महिन्यातील सोमवारला विशेष महत्त्व असतं. श्रावणी सोमवारच्या निमित्तानं देशभरातील मंदिरं गर्दीनं फुलून गेली आहेत. महाराष्ट्रात आज श्रावणातील पहिला सोमवार आहे. इथं ही ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. पूजाअर्चा सुरू आहेत.