Devendra Fadnavis on Ladki Bahin Yojana video : महिला सक्षमीकरणांतर्गत जळगाव इथं झालेल्या माझी लाडकी बहीण योजना कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केलं. लाडकी बहीण योजनेवर टीका करणाऱ्या विरोधकांना फडणवीस यांनी उत्तर दिलं. तुमचं सरकार असताना तुम्ही फुटकी कवडी दिली नाही. आम्ही आमच्या बहिणींना देतोय तर तुमच्या पोटात का दुखतंय, असा सवाल त्यांनी विरोधकांना केला. महायुतीचं सरकार असेपर्यंत ही योजना अजिबात बंद होणार नाही. कुणीही ही योजना बंद करू शकणार नाही, अशी ग्वाही देखील फडणवीस यांनी दिली.