Devendra Fadnavis : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीमध्ये आनंदाचं वातावरण आहे. भाजपचे कार्यकर्ते महायुतीच्या विजयाचं श्रेय देवेंद्र फडणवीस यांना दिलं जात आहेत. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या एकजुटीला आणि जनतेला या विजयाचं श्रेय दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली 'एक है तो सेफ है' ही घोषणा महाराष्ट्रानं सत्यात उतरवली आहे, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली आहे. 'आम्ही आधुनिक अभिमन्यू आहोत. आम्ही चक्रव्यूह तोडून दाखवून दाखवू. तो चक्रव्यूह आम्ही तोडून दाखवला आहे, असंही फडणवीस म्हणाले.