devendra fadnavis video : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या ८ महिन्यांत पडल्यानं महाराष्ट्रात व शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर शिवप्रेमींसह विरोधकांनीही राज्यातील महायुती सरकारला घेरलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ही घटना आमच्यासाठी दु:खद आहे. मात्र, त्याहीपेक्षा या घटनेवरून सुरू असलेलं राजकारण वेदनादायी आहे. शिवरायांच्या पडलेल्या पुतळ्याचे फोटो अशा प्रकारे व्हायरल करायला नको होते. खरा मावळा असं कधीच करणार नाही. ते अतिशय चुकीचं आहे, असं ते म्हणाले. त्यांचा रोख विरोधकांवर होता.