Devendra Fadnavis reaction on Ashok Chavan : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज पक्ष सदस्यत्वाचा व आमदारकीचा राजीनामा दिला. ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. 'काँग्रेस पक्ष ज्या पद्धतीनं चाललाय, त्यामुळं त्या पक्षातील लोकनेत्यांची घुसमट होत आहे. हे सर्व नेते भाजपमध्ये येऊ इच्छित आहेत. अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत. देशभरात हा ट्रेंड आहे,' असं फडणवीस म्हणाले.