Beed Sarpanch Family Meets Devendra Fadnavis : निर्घृण हत्या झालेले बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी नुकतीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. देशमुख कुटुंबीयांनी यावेळी तपासाच्या प्रगतीची माहिती घेतली. संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील एकाही दोषीला सोडणार नाही, असा शब्द फडणवीस यांनी यावेळी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना दिला.