Devendra Fadnavis : पुण्यातील बालेवाडी इथं नुकतंच महाराष्ट्र भाजपचं राज्यस्तरीय अधिवेशन झालं. या अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. लोकसभा निवडणुकीत महायुतीचा अवघ्या काही मतांच्या फरकानं पराभव झाला. आपली लढाई तीन पक्षांशी नव्हती, चौघांशी होती. त्यातला चौथा होता फेक नरेटिव्हचा. तो खोडून काढण्यात आपण अपयशी ठरलो. आपल्या कार्यकर्त्यांना उत्तर देता येतं, पण ते आदेशाची वाट पाहत असतात. आता मी तुम्हाला परवानगी देतो. आदेशाची वाट पाहू नका. मैदानात उतरा आणि ठोकून काढा. आगामी निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीचंच सरकार येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.