Nana Patekar home Ganpati : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या घरी दरवर्षीप्रमाणे गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी त्यांच्या घरी मान्यवरांची रीघ लागली आहे. नुकतीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी नानांच्या घरी भेट देऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं.फडणवीस गाडीतून उतरताच नानांनी त्यांना मिठी मारली. तर, अजित पवारांचा हात धरून ते घरात घेऊन गेले. यावेळी तिघांमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात गप्पाही झाल्या.