Team India Victory Parade Video : टी-२० विश्वचषक जिंकून आलेल्या भारतीय क्रिकेटपटूंची विजयी मिरवणूक आज मुंबईत निघाली. जगज्जेत्या क्रिकेटपटूंच्या स्वागतासाठी व त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यासाठी मुंबईकरांनी मिरवणुकीच्या मार्गावर तोबा गर्दी केली होती. मात्र, जल्लोष करत असतानाही मुंबईकरांचं भान सुटलं नाही. त्याच वेळी आलेल्या एका रुग्णवाहिकेला काही क्षणांतच वाट मोकळी करून दिली गेली.