Congress Gherao Morch in Mumbai : अदानी समूहाच्या कथित आर्थिक घोटाळ्याची चौकशी करावी या मागणीसाठी काँग्रेस पक्षानं आज देशभरातील राजभवनावर मोर्चा काढला. मुंबईत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली गिरगाव चौपाटी ते राजभवन मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर काँग्रेस शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस यांना निवेदन दिले. या मोर्चात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, सतेज (बंटी) पाटील, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्यासह अनेक नेते व हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. ये रिश्ता क्या कहलाता है... मोदी अदानी भाई भाई, देश बेचके खाई मलाई... अशा घोषणा मोर्चेकरी देत होते. त्यांच्या हातात मोदी व अदानी विरोधी घोषणांचे बॅनर होते. यावेळी काँग्रेस नेत्यांनी आपल्या भाषणातून मोदी सरकारवर जोरदार तोफ डागली.