Mallikarjun Kharge Warns Mohan Bhagwat : ‘अयोध्येतील रामलल्ला यांच्या प्राणप्रतिष्ठेचा दिवस 'प्रतिष्ठा द्वादशी’ म्हणून साजरी करावी, कारण अनेक शतकांपासून शत्रूंच्या हल्ल्यांना तोंड देत असलेल्या देशाला याच दिवशी खरं स्वातंत्र्य मिळालं, असं विधान भागवत यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरून काँग्रेसनं टीकेची झोड उठवली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोहन भागवत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ज्यांनी कधी स्वातंत्र्यासाठी लढाई केली नाही ते आज स्वातंत्र्याबद्दल बोलत आहेत. त्यांनी अशीच बडबड सुरू ठेवली तर त्यांना देशात फिरणं कठीण होऊन जाईल, असा इशारा खर्गे यांनी दिला.