Priyanka Gandhi Speech In Lok Sabha : लोकसभेवर पहिल्यांदाच निवडून गेलेल्या काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी आज संसदेत पहिलं भाषण केलं. संविधानावरील चर्चेची सुरुवातच त्यांच्या भाषणानं झाली. यावेळी प्रियांका गांधी यांनी पंडित नेहरू व इंदिरा गांधी यांच्या राजवटीसह आताच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. देशातील संवादाची परंपरा कशी खंडित झाली आहे यावरही त्यांनी भाष्य केलं. देश सध्या भीतीच्या छायेत आहे. सगळ्यांचे आवाज दाबले जात आहेत. पण भयाची सुद्धा एक मर्यादा असते. तुम्ही कोणाला सदासर्वकाळ घाबरवून ठेवू शकत नाही. जेव्हा गमावण्यासारखं काहीच राहत नाही तेव्हा तो उसळून उठतो. अशा व्यक्तीसमोर भेकड उभा राहू शकत नाही. हा देश भेकड लोकांच्या हाती फार काळ राहिलेला नाही. हा देश पुन्हा उठेल आणि सत्यासाठी लढेल,’ असा आशावाद प्रियांका यांनी व्यक्त केला.