Priyanka Gandhi Speech Video : लोकसभेवर पहिल्यांदाच निवडून गेलेल्या काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी आज संसदेत पहिलं भाषण केलं. संविधानावरील चर्चेची सुरुवातच त्यांच्या भाषणानं झाली. यावेळी प्रियांका गांधी यांनी पंडित नेहरू व इंदिरा गांधी यांच्या राजवटीसह आताच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. देशातील संवादाची परंपरा कशी खंडित झाली आहे यावरही त्यांनी भाष्य केलं. तसंच, देशातील भीतीचं वातावरण, जातवार जनगणना, अदानी यांवरही त्यांनी भाष्य केलं. ‘भारत देश भित्र्यांच्या हाती फार काळ राहिलेला नाही आणि राहणार नाही,’ असा जहरी टोला त्यांनी मोदी सरकारला हाणला.