Video : शिवाजी महाराज, शाहू महाराज नसते तर संविधान नसतं! राहुल गांधी यांनी सांगितला थेट संबंध
मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : शिवाजी महाराज, शाहू महाराज नसते तर संविधान नसतं! राहुल गांधी यांनी सांगितला थेट संबंध

Video : शिवाजी महाराज, शाहू महाराज नसते तर संविधान नसतं! राहुल गांधी यांनी सांगितला थेट संबंध

Published Oct 07, 2024 11:49 AM IST

Rahul Gandhi Speech Video : कोल्हापूरमधील कसबा बावडा इथं उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं शनिवार, ५ ऑक्टोबर २०२४ रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हस्ते अनावरण झालं. यावेळी जमलेल्या विशाल जनसमुदायाला राहुल गांधी यांनी संबोधित केलं. ज्यांचं कार्य आपल्याला आदर्शवत वाटतं, त्यांच्याच मूर्ती आपण उभारतो. शिवाजी महाराजांच्या इतकं आपण करू शकणार नाही, मात्र जे करता येईल तेवढं करणं आपलं कर्तव्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य आणि देशाची राज्यघटना याचा थेट संबंध आहे. शिवरायांनी जे-जे कार्य केलं, ते सगळं संविधानात आहे. ते नसते तर हे संविधानही नसतं, असं राहुल गांधी म्हणाले.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp