Maharashtra Assembly Elections : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंबईत झालेल्या महाविकास आघाडीच्या जाहीर सभेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली. भाजपचं सरकार हे फक्त अदानीसाठी काम करतंय. नोटबंदी आणि जीएसटी ही धोरणे नाहीत, ही शस्त्रं आहेत. छोट्या व्यावसायिकांना, सर्वसामान्यांना मारण्याची शस्त्रं आहेत. तुमच्या खिशातला पैसा काढून अदानीच्या खिशात टाकला जातोय, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. महाराष्ट्रातील जनतेला राहुल गांधी यांनी पाच गॅरंटीही दिल्या.