Rahul Gandhi at Bharat Jodo Nyay Yatra : भारत जोडो न्याय यात्रेत बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केला. काशी विश्वनाथच्या मंदिरात गेलो तेव्हा पोलिसांनी सगळे मोबाइल फोन काढून घेतले. राहुल गांधी शिवमंदिरात गेल्याचे फोटोही दिसू नयेत असा भाजपचा प्रयत्न आहे. माझं हे भाषणही टीव्हीवर दाखवलं जाणार नाही, असंही राहुल गांधी म्हणाले.