Nana Patole Celebrates Kasba Victory with Congress Workers : कसबा पेठ पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा दणदणीत विजय झाला. या विजयाचा जल्लोष मुंबईतील काँग्रेस मुख्यालय टिळक भवन येथे ढोल ताशांच्या गजरात मिठाई वाटून व फटाके फोडून साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांनी यावेळी डीजेच्या गाण्यावर ताल धरला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेही यात सहभागी झाले आणि कार्यकर्त्यांसोबत थिरकले. यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, आमदार विकास ठाकरे, वजाहत मिर्झा, प्रदेश उपाध्यक्षा चारुलता टोकस, प्रदेश सरचिटणीस प्रमोद मोरे, उत्कर्षा रुपवते, प्रवक्त्या भावना जैन, प्रदेश सचिव राजाराम देशमुख, झिशान अहमद, अर्चना राठोड, दत्ता नांदे, अशोक आमानकर यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.