Video : आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपुरात आज विठ्ठलभक्तांचा महापूर आला आहे. देशभरातून वारकरी पंढरीत दाखल झाले आहेत. परंपरेप्रमाणे आषाढी एकादशीची शासकीय महापूजा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाली. मुख्यमंत्र्यांचे आई-वडील देखील यावेळी उपस्थित होते.