Eknath shinde Video : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा १९ सप्टेंबर रोजी बुलढाण्यात पार पडला. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या महिलावर्गाला संबोधित केलं. लाडकी बहीण योजना ही राजकीय लाभासाठी किंवा स्वार्थासाठी सुरू केलेली नाही. राज्यातील माता-भगिणींच्या आयुष्यात सुखाचे, समाधानाचे दिवस यावेत हीच आमची भावना आहे. ही योजना कायम सुरू राहील. तुम्ही आम्हाला बळ दिलं तर आम्ही दीड हजारावर थांबणार नाही. दीड हजाराचे दोन हजार होतील. जास्त बळ दिलं तर अडीच हजार होतील. त्याहीपेक्षा जास्त बळ दिलं तर ३ हजार होतील. तीन हजार पेक्षाही जास्त देण्याची संधी मिळाली तरी आम्ही हात आखडता घेणार नाही, असं एकनाथ शिंदे म्हणाले.