Devendra Fadnavis Praises Kangana Ranaut : 'इमर्जन्सी' सिनेमाच्या विशेष शोचं आज आयोजन करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या शोला हजेरी लावली. त्यानंतर बोलताना फडणवीसांनी कंगना यांनी चित्रपटात साकारलेल्या इंदिरा गांधी यांच्या व्यक्तिरेखेचं कौतुक केलं. आणीबाणीच्या कालखंडाचा इतिहास व एका नेत्याचा प्रवास यातून समोर येतो, असं फडणवीस म्हणाले.